Me Sahyadri July 2016 a

/ Sahyadri Geographic by Vivek Kale
 
Me Sahyadri
July 2016
Volume 3, number 10
Keep Volume Low.
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded. Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation. Please give sufficient time to allow the photographs to load. Special thanks to Ramit Singal and all those who helped me during the compilation and for the help and guidance during the workshop. The audio in the blog is symbolic and do not represnt the frogs displayed here.
 
देशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.
सह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.
As the economic development has taken the center stage, the balance between the environmental sustenance and socio economic development will be under the scanner. As most experts with balanced views have proclaimed, Indian wildlife and ecological system sustenance will be under threat, unless precautions are taken with the help of appropriate research and long term national interests. As we encounter the economic development, many habitats which indirectly or directly help sustainable development will be damaged. The awareness to gauge the success by sustainable development and not by year to year growth is a distant dream any environmentalist will assume in current scenario.
Western ghats, or Sahyadri as we all call it as, is a treasure trove of spectacular landscapes, biodiversity, flora, fauna, some amazing geological wonders and man made monuments. With the increasing pressure from human encroachment, all these elements are under stress and in turn are under depletion. Western ghats should be left untouched by human beings, to protect their future generations from getting short of resources, such as water, energy and clean air. The important elements of western ghats, which need protection are highlighted in the new version of Photo journal, Me Sahyadri Magazine. The current issue has a brief of frog life and forest, their habitat, from Coorg region of Western Ghats.
 
““
 
Me Sahyadri – July 2016
 
बेडकांबद्दल महत्वाच्या १० बाबी, १) बेडुक पाण्याजवळ किंवा पाण्यात रहातात. ते प्रदुषणाचे निर्देशक आहेत. जलप्रदुषणामुळे बेडुकांची संख्या कमी होते आहे. शेतात वापरल्या जाणाऱ्या किटकनाशकांमुळे व इतर रसायनांमुळे जलप्रदुषण होते.
२) बेडकांचे लहान अधिवास मोठया जंगलाच्या अधिवासाचे लहान भाग असतात. झाडे, तलाव, डबकी, झुडुपे, झरे व ओढे, दगड धोंडे असे विविध अधिवास विविध बेडकांना आश्रय देतात. या सर्व घटकांचे संवर्धन म्हणजेच बेडकांचे संवर्धन होय.
३) पश्चिम घाटात दिसणारे बहुतांश बेडुक अंतर्जन्य आहेत. त्यांचा अधिवास पश्चिम घाटापुरता मर्यादीत आहे. पश्चिम घाटाचे संवर्धन म्हणजे त्यांचे संवर्धन होय.
४) जलप्रदुषण, शेतकी प्रगती, बुरशी रोगराई, अधिवासाचा विनाश अशा कारणांमुळे बेडुक कमी होत आहेत.
५)बेडुक हा खाद्यश्रुंखलेतला महत्वाचा घटक आहे. लहान किडे, डास यांना खाद्य करुन तो त्यांच्या संख्येवत नियंत्रण ठेवतो.
६) बेडुक पावसाळ्या व्यतिरिक्त काळात सुप्त (हायबरनेट) होतात.
७) बेडुक पावसाळ्यात अंडी टाकतात.
८) सह्याद्रीत आढळणाऱ्या बेडकांमध्ये बरेच बेडुक संकटात आहेत. आय यु सि एन संस्थेच्या वर्गिकरणाप्रमाणे या बेडकांना वाचवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.
९) वाघ, सिंहांवर जेवढे पैसे खर्च केले जात आहेत, त्यामानाने बेडकासारख्या लहान पण तितक्याच मह्त्वाच्या प्राण्यांकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत.
१०) पश्चिम घाटात सध्या काही नविन बेडकांचे शोध लागले आहेत. बऱ्याच जातींवर संशोधन चालु आहे.
10 important aspects about frog are
1) Frogs are indicators of water pollution. The population of frogs is reducing due to water pollution. Water pollution takes place due to use of pesticides and other chemicals.
2) Frogs live in microhabitats within the larger forest habitat. These microhabitats can be streams, rocks, trees, bush, puddles, soil, low foliage. Conservation of every such element within the larger forest habitat is important.
3) Western ghats has many endemic species of frogs. Conservation of western ghats is important for survival of these species.
4) Water pollution, agricultural development, tourism, fungal infections, loss of habitat are the main reasons of reduction in numbers of frogs.
5) Frog is important part of food chain. They feed on insects, mosquitoes.
6) Frogs hibernate most of the time in year during non monsoon period.
7) Most of the frogs in western ghats breed in Monsoon.
8) Many species of frogs in western ghat appear as Threatened as per IUCN red list. The species are protected as per Indian Wildlife act.
9) Govt is spending funds on tigers and lions but not on frogs.
10) Many species of frogs in western ghats are being discovered. The research on the frogs is under progress by various research organizations.
 
““
 
1. Anil’s bush frog (Raorchestes anili), Coorg, western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस अनिली नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याचा आकार २४-२९ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो. त्याचे वास्तव्य लहान झुडुपांमध्ये जमिनीपासुन १ ते २ मीटर उंचीपर्यंत असते. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. समुद्रसपाटीपासुन १००० ते १५०० मीटर उंचीवर असलेल्या सह्याद्रीच्या कर्नाटक व केरळ राज्यात पलक्कड गॅप च्या दोन्ही बाजुस आढळतो. हा बेडुक मनुष्य वस्तीजवळ सुद्धा आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "लिस्ट कन्सर्न" असा वर्ग देण्यात आला आहे. या बेडकाला सध्या धोका कमी असुन त्यांची संख्या टिकुन आहे.
या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. सुर्यास्तानंतर तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
या बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग पिवळट लाल असुन त्याभोवती करडे वर्तुळ असते. डोळ्यांमधले बुबुळ काळपट तपकिरी असते. हा बेडुक रंगाने फिकट तपकिरी असतो. त्याच्या अंगावर गडद तपकिरी खुणा असतात.
टिक.....टिक.....टिक.....टिक.... .टिक.....टिक....टिक....टिक.... टिक..टिक..टिक..टिक्टिक्टिक्टिक असा आवाज काढतो.
हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.
The western ghat in Coorg region in Karnataka has wide array of microhabitats for the frogs. The small bush habitat of coffee plantation is one of these arrays of microhabitats. Though coffee plantation is completely man made habitat, there is also, the natural forest habitat around most of these coffee plantations. There are about 52 species of bush frogs from Raorchestes family in India. This frog genus is under grave threats, mainly due to the habitat degradation caused by the cultivation of coffee, tea, and eucalyptus. The deforestation, agricultural practices and unplanned tourism are the threats to this family of frogs.
One of the bush frogs of the region is Raorchestes anili, commonly known as Anil’s bush frog. The frog is named to respect the scientist Anil Zachariah. It is about 24-29 mm in size. As normally seen, females are larger than male frogs.
This frog is commonly found in shrubs in moist semi-deciduous forests, in roadside shrubs, bamboo, and gardens, even right near the human habitation. These frogs are found 1-2 m above the ground on vegetation and coffee plants. The species breeds by direct development. This species is widely distributed at 1000-1500 m altitude in and around Wayanad District, Kerala State (on either sides of Palakkad gap), in the Western Ghats of India. Raorchestes anili is endemic to Western Ghats, and is rated as least concern as per IUCN red list.
The frog has pointed protruding snout. The flanks and groin of the frog is deep brown with light gray spots. The eye pupil is horizontally oval. Tympanum is round, and is three times the eye diameter.
Males have a median vocal sac. This species begins calling during or immediately after sunset. The dorsum is light brown with irregular deep brown patches. The yellowish-red iris is encircled by a gray ring. The dorsal surfaces of the limbs are light brown with dark brown cross-bands.
The front leg and hing leg digits have discs which help the frog to climb the bushes and small rocks. The front legs do not have any webs. The hind legs have very small webbing between the digits.
 
2. Anil’s bush frog (Raorchestes anili), Coorg, western ghats, India
 
““
 
3. Anil’s bush frog (Raorchestes anili), Coorg, western ghats, India
 
““
 
4. Anil’s bush frog (Raorchestes anili), Coorg, western ghats, India
 
““
 
5. Yellow bush frog or blue eyed bush frog (Raorchestes luteolus), Coorg, western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस लुटेलॉस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याला निळ्या डोळ्यांचा पिवळा बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार ३०-३४ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो. त्याचे वास्तव्य लहान झुडुपांमध्ये जमिनीपासुन १ ते ४ मीटर उंचीपर्यंत असते. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ९०० ते ११०० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो.
आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "डाटा डिफिशियंट" असा वर्ग देण्यात आला आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. सुर्यास्तानंतर तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
या बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग पिवळट सोनेरी असुन त्याभोवती निळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने तपकिरी पिवळा असतो. त्याच्या अंगावर अस्पष्ट तपकिरी पट्टे असतात. पोटाकडे पिवळ्या रंगावर तपकिरी जाळीदार नक्षी असते.
हा बेडुक हा बेडुक ट्र्र्र्र्र्र्र्र टक टक टक टक टक टक टक असा आवाज काढतो.
हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.
The western ghat in Coorg region in Karnataka have wide array of microhabitats for the frogs. The small bush habitat of coffee plantation is one of these arrays of microhabitats. Though coffee plantation is completely man made habitat, there is also, the natural forest habitat around most of these coffee plantations. There are about 52 species of bush frogs from Raorchestes family in India. This frog genus is under grave threats, mainly due to the habitat degradation caused by the cultivation of eucalyptus, coffee and tea plantations. The deforestation, agricultural practices and unplanned tourism are the other threats to this family of frogs. One of the bush frogs of the region is Raorchestes luteolus, commonly known as Yellow bush frog or blue eyed bush frog. It is about 30-34 mm in size. This frog is seen in evergreen shrubs and lower levels of forest trees in moist semideciduous forests. It is endemic to western ghats, and is rated as data defficient as per IUCN red list. The frog is seen mainly in south western ghats north of Palakkad gap. This species has been recorded at Madenadu and near Madikeri in Kodagu District, Karnataka. It has also been recorded from Malleshwaram in Kudrumukh in Chikmagalur District. All these records are from the Western Ghats of the southern part of Karnataka State, India. The altitudinal range of this species is 920-1120 meter above sea level. The frog is yellow in color with light brown specks uniformly granular in texture and usually has four to six faint discontinuous stripes running from snout to vent in dorsal region. Iris in the eye of this frog is golden yellow with blue outer ring. The frog has pointed snout. The flank and belly of the frog is deep granular. The front leg and hing leg digits have discs which help the frog to climb the bushes and small rocks. The front legs do not have any webs. The hind legs have very small webbing between the digits. Males are yellow during breeding season and cream in the non-breeding season. Males have a median vocal sac. This species begins calling during or immediately after sunset.
 
““
 
6. Yellow bush frog or blue eyed bush frog (Raorchestes luteolus), Coorg, western ghats, India
 
““
 
7. Yellow bush frog or blue eyed bush frog (Raorchestes luteolus), Coorg, western ghats, India
 
““
 
8. Glandular bush frog (Raorchestes glandulosus), Coorg, western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस ग्लॅंडुलस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. ग्लॅंडुलस बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार २२-२७ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो. त्याचे वास्तव्य लहान झुडुपांमध्ये व झाडांवर जमिनीपासुन अंदाजे ४ मीटर उंचीवर असते. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते.
कर्नाटक (दक्षिण) व केरळ (पलक्कड गॅप च्या उत्तरेस) राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ४०० ते २००० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "व्हलनरेबल" असा वर्ग देण्यात आला आहे. याचा अर्थ ह्या बेडकाचे अस्तित्व कमी होत आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. तो निशाचर आहे. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
या बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग पिवळट सोनेरी असुन त्याभोवती निळे/काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने पिवळा/करडा असतो. या बेडकामध्ये विविश रंगछटा आढळतात. त्याच्या अंगावर अस्पष्ट ठिपके असतात. पोटाकडे पिवळ्या रंगावर तपकिरी जाळीदार नक्षी असते.
हा बेडुक टि..टि..टि..............टि..टि..टि............टि..टि..टि असा आवाज काढतो.
हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.
The western ghat in Coorg region in Karnataka have wide array of microhabitats for the frogs. The small bush habitat of coffee plantation is one of these arrays of microhabitats. Though coffee plantation is completely man-made habitat, there is also, the natural forest habitat around most of these coffee plantations. There are about 52 species of bush frogs from Raorchestes family in India. This frog genus is under grave threats, mainly due to the habitat degradation caused by the cultivation of eucalyptus, coffee and tea plantations. The deforestation, agricultural practices and unplanned tourism are the other threats to this family of frogs.
One of the bush frogs of the region is Raorchestes glandulosus, commonly known as glandular bush frog, rough-skinned bush frog, southern bubble-nest frog. It is about 22-27 mm in size. Raorchestes glandulosus is nocturnal, arboreal species, usually found in higher that 4 meter above the ground. This frog is seen in understorey of tropical moist forest. It is endemic to western ghats, and is rated as vulnerable as per IUCN red list. The frog is seen mainly in south western ghats on north side of Palakkad gap.
The frog has yellow dorsal surface. The front leg and hind leg digits have discs which help the frog to climb the bushes and trees. The front legs do not have any webs. The hind legs have very small webbing between the digits. As the frog has several morphs with various coloration.
This Indian species has been recorded from the Nilgiris, Anamalai Hills, and Agasthyamala Hill ranges, Kudremukh National Park, and from several localities in Maharashtra State. It has an altitudinal range of between 400 and 2,000m above seal level.
 
““
 
9. Glandular bush frog (Raorchestes glandulosus), Coorg, western ghats, India
 
.
.
 
““
 
10. Glandular bush frog (Raorchestes glandulosus), Coorg, western ghats, India
 
““
 
11. Glandular bush frog (Raorchestes glandulosus), Coorg, western ghats, India
 
““
 
12. Ponmudi bush frog (Raorchestes ponmudi), Coorg, Karnataka, western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओचेस्टस पोनमुडी नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. त्याला पोनमुडी बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार ३९-४३ मी.मी असतो. नर आकराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो.
त्याचे वास्तव्य मुख्यत: गवताळ प्रदेशाजवळच्या जंगलात जास्त आढळतो. अगस्त्यमाला डोंगररांगेतल्या पोनमुडी डोंगरावरुन याचे नाव पडले आहे. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन १००० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "क्रिटिकली एनडेन्जरड" असा वर्ग देण्यात आला आहे. याचा अर्थ या बेडकाचे अस्तित्व अत्यंत कमी होत आहे. हा बेडुक नामशेष होण्याच्या जवळ पोहोचला असुन त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे.
या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. तो निशाचर आहे. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
या बेडकाचे तोंड गोलाकार असते. डोळ्यांचा रंग तपकिरी असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने तपकिरी असतो. पोटाकडे पांढऱ्या रंगावर तपकिरी जाळीदार नक्षी असते.
हा बेडुक ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ट..............ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ट............ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ट असा आवाज काढतो.
हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.
The western ghat in Coorg region in Karnataka have wide array of microhabitats for the frogs. The small bush habitat of coffee plantation is one of these arrays of microhabitats. Though coffee plantation is completely man-made habitat, there is also, the natural forest habitat around most of these coffee plantations. There are about 52 species of bush frogs from Raorchestes family in India. This frog genus is under grave threats, mainly due to the habitat degradation caused by the cultivation of eucalyptus, coffee and tea plantations. The deforestation, agricultural practices and unplanned tourism are the other threats to this family of frogs.
One of the bush frogs of the region is Raorchestes ponmudi, commonly known as Ponmudi Bush frog. The frog is named after the Ponmudi hill. It is about 39-43 mm in size. As seem normally, female is larger in size as compared to the male. This frog is seen in evergreen shrubs and higher levels of forest trees in moist semi-deciduous forests. This species is known from a patch of evergreen forest surrounded by grassland. It breeds by direct development.
It is endemic to western ghats, and is rated as critically endangered as per IUCN red list. This species is known only from the type locality at 1,000 m above sea level on Ponmudi Hill, part of the Agasthyamala Hill range in the Western Ghats of India.
The frog is mainly light gray yellow in color with two black strips starting from behind the eyes till vent. Iris in the eye of this frog is golden brown with silver white outer ring. The frog has rounded snout. The flank and belly of the frog is granular. The thighs are a light chocolate brown and are vermiculated with gray patches that differ in size. Between the eyes, there is a light brown triangle which extends to the upper eyelid. The snout, loreal region, and tympanic region are all light brown, with dark gray upper eyelids.
The front leg and hind leg digits have discs which help the frog to climb the bushes and trees. The front legs do not have any webs. The hind legs have very small webbing between the digits. The forelimbs have dark brown spots and are light brown, and the hind limbs are light brown with gray cross bands. The posterior of the thigh is light chocolate brown and is vermiculated with patches of grey.
 
““
 
13. Ponmudi bush frog (Raorchestes ponmudi), Coorg, Karnataka, western ghats, India
 
““
 
14. Confusing green bush frog, Raorchestes chromasynchysi, Coorg, Karnataka, western ghats
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस क्रोमासिंकिसी नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. त्याला कन्फ्युजिंग बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार २७-३० मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, शोला जंगलात आढळतो.
या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन १००० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "व्हलनरेबल" असा वर्ग देण्यात आला आहे. याचा अर्थ या बेडकाचे अस्तित्व कमी होत आहे. त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर व जमिनीवर रहातो. तो निशाचर आहे. पावसाळ्यात तो जमिनीलगत झुडुपावर किंवा जमिनीचरच्या पानगळीत दिसतो. माणसाच्या व इतर ध्वनि प्रदुषणाचा त्याच्यावर विपरित परिणाम होतो.
त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
या बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग सोनेरी पिवळा असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने पिवळट तपकिरी किंवा पिवळा किंवा हिरवा असतो. त्याच्या विविध रंगछटांमुळे त्याला कन्फ्युजिंग बुश फ्रॉग म्हणतात.
हा बेडुक टिड्टिड्टि.......टिड्टिड्टि.......टिड्टिड्टि....... असा आवाज काढतो.
हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.
The western ghat in Coorg region in Karnataka have wide array of microhabitats for the frogs. The small bush habitat of coffee plantation is one of these arrays of microhabitats. Though coffee plantation is completely man-made habitat, there is also, the natural forest habitat around most of these coffee plantations. There are about 52 species of bush frogs from Raorchestes family in India. This frog genus is under grave threats, mainly due to the habitat degradation caused by the cultivation of eucalyptus, coffee and tea plantations. The deforestation, agricultural practices and unplanned tourism are the other threats to this family of frogs.
One of the medium sized bush frogs of the region is Raorchestes chromasynchysi, commonly known as confusing green Bush frog. It is about 27-30 mm in size. This frog is seen in evergreen shrubs in moist semi-deciduous forests. It is endemic to western ghats, and is rated as vulnerable as per IUCN red list.
The frog is seen mainly in south western ghats on north side of Palakkad gap. It occurs in shola forests Shola forest is a type of high-altitude evergreen forest formed by shrubs and small trees found only in the southern portion of the Western Ghats. It is also recorded in medium-level wet evergreen forests in Coorg, as well as in coffee and cardamom plantations adjacent to forested areas in Honey Valley Estate and Talakaveri. During monsoon individuals can be found either on the ground under leaf litter or on leaves about one meter above the ground in forest patches. It is thought to be a forest-dwelling species highly sensitive to noise disturbance.
The frog is mainly brownish gray or sometimes yellowish or greenish in color with granular spinules. The frog has pointed snout. The flank and groin of the frog has granular pattern. The front leg and hind leg digits have discs which help the frog to climb the bushes and trees. The front legs do not have any webs. The hind legs have very small webbing between the digits. As the frog has several morphs with various coloration, it is called as confusing colored frog. The frog has distinct tympanum.
 
““
 
15.Knob handed bush frog, Raorchestes tuberehumerus, Coorg, Karnataka, Western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस ट्युबरेह्युमरस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याचा आकार २२-२४ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, शोला जंगलात आढळतो.
या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात (पल्लकड गॅप च्या उत्तरेस सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ९०० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "डाटा डिफिशियन्ट" असा वर्ग देण्यात आला आहे. त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. तो निशाचर आहे. पावसाळ्यात तो जमिनीलगत झुडुपावर किंवा जमिनीचरच्या पानगळीत दिसतो.
त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
या बेडकाचे तोंड गोलाकार असते. डोळ्यांचा रंग सोनेरी पिवळा असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने तपकिरी असतो. या बेडकाच्या हातांजवळ एक हाड असते. त्यामुळे त्याला नॉब हॅन्डेड बुश फ्रॉग असे म्हणतात.
हा बेडुक टिटिटि.......टिटिटि.......टिटिटि....... असा आवाज काढतो.
हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.
The western ghat in Coorg region in Karnataka have wide array of microhabitats for the frogs. The small bush habitat of coffee plantation is one of these arrays of microhabitats. Though coffee plantation is completely man-made habitat, there is also, the natural forest habitat around most of these coffee plantations. There are about 52 species of bush frogs from Raorchestes family in India. This frog genus is under grave threats, mainly due to the habitat degradation caused by the cultivation of eucalyptus, coffee and tea plantations. The deforestation, agricultural practices and unplanned tourism are the other threats to this family of frogs.
One of the small bush frogs of the region is Raorchestes tuberehumerus, commonly known as Knob-handed Bush frog. It is about 22-24 mm in size. This frog is seen in evergreen shrubs in moist semi-deciduous forests. It is endemic to western ghats, and is rated as data deficient as per IUCN red list.
The frog is seen mainly in south western ghats on north side of Palakad gap. This species has been recorded at Kirundadu, near Madikeri, in Kodagu District, and also from Malleshwaram in Kudrumukh in Chikmagalur District in Karnataka. These locations are in the Western Ghats of the southern part of Karnataka State, India. It has been recorded at altitudes between 920 and 940m above sea level.
The frog is mainly brownish gray in color with spinular projections. Iris in the eye of this frog is golden brown. The frog has sub-elliptical snout. The flank and groin of the frog has yellow patches on brown background. The front leg and hind leg digits have discs which help the frog to climb the bushes and trees. The front legs do not have any webs. The hind legs have very small webbing between the digits. The frog has projection on humerus bone near front legs, and hence it is called as knob-handed bush frog.
 
““
 
16. Knob handed bush frog, Raorchestes tuberehumerus, Coorg, Karnataka, Western ghats, India
 
.
.
 
““
 
17. Knob handed bush frog, Raorchestes tuberehumerus, Coorg, Karnataka, Western ghats, India
 
.
.
 
18. Anil’s bush frog (Raorchestes anili), Coorg, western ghats, India
 
19. Anil’s bush frog (Raorchestes anili), Coorg, western ghats, India
 
20. Anil’s bush frog (Raorchestes anili), Coorg, western ghats, India
 
.
.
 
““
 
21. Seshachar’s bush frog , Raorchestes charius, Coorg, Karnataka, western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये बुश फ्रॉग (राओर्चेस्टेस) म्हणजे झुडुपांमध्ये व लहान झाडांवर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. राओर्चेस्टेस प्रकारचे ५२ बेडुक आपल्या देशात आढळतात. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या बुश फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध बुश फ्रॉग्स मध्ये राओर्चेस्टेस चेरिअस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याचा आकार १५-४५ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, शोला जंगलात आढळतो. तो झाडावर किंवा जमिनीवर पानगळीत आढळतो.
या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ८००-१२०० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "एन्डेंजर्ड" असा वर्ग देण्यात आला आहे. त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर व जमिनीवर रहातो. पावसाळ्यात तो जमिनीलगत झुडुपावर किंवा जमिनीचरच्या पानगळीत दिसतो.
त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
या बेडकाचे तोंड गोलाकार असते. डोळ्यांचा रंग सोनेरी पिवळा असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने पिवळ असतो.
हा बेडुक टिक.......टिक.......टिक....... असा आवाज काढतो.
हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.
The western ghat in Coorg region in Karnataka have wide array of microhabitats for the frogs. The small bush habitat of coffee plantation is one of these arrays of microhabitats. Though coffee plantation is completely man-made habitat, there is also, the natural forest habitat around most of these coffee plantations. There are about 52 species of bush frogs from Raorchestes family in India. This frog genus is under grave threats, mainly due to the habitat degradation caused by the cultivation of eucalyptus, coffee and tea plantations. The deforestation, agricultural practices and unplanned tourism are the other threats to this family of frogs.
One of the bush frogs of the region is Raorchestes charius, commonly known as Seshachar’s bush frog. Raorchestes charius is, arboreal species, usually occurring in tropical moist evergreen forest, though it may also be found in secondary forest close to primary forest edge. It is believed to breed by direct development. It is often found in leaf litter.
It is endemic to western ghats, and is rated as endangered as per IUCN red list. The frog is seen mainly in south western ghats on north side of Palakkad gap. This species is recorded at Chikmalagur in Karnataka State, in the southern Western Ghats of India. The altitudinal range is between 800 and 1,200m above sea level.
The frog has yellow dorsal surface. The front leg and hind leg digits have discs which help the frog to climb the bushes and trees. The front legs do not have any webs. The hind legs have very small webbing between the digits. As the frog has several morphs with various coloration.
 
““
 
22. Seshachar’s bush frog , Raorchestes charius, Coorg, Karnataka, western ghats, India
 
.
.
 
““
 
23. Seshachar’s bush frog , Raorchestes charius, Coorg, Karnataka, western ghats, India
 
““
 
24. Seshachar’s bush frog , Raorchestes charius, Coorg, Karnataka, western ghats, India
 
““
 
24. Seshachar’s bush frog , Raorchestes charius, Coorg, Karnataka, western ghats, India ,Balloon frog, western ghats, India
 
““
 
25.Bedomme cat snake, Coorg, Karnataka, western ghats, India
 
.
.
 
““
 
26. Bedomme cat snake, Coorg, Karnataka, western ghats, India
 
..
..
 
““
 
25. Grassland, Shola forest habitat with cofee plantation, Coorg, western ghats, Karnataka, India
 
For any queries and suggestions contact at kale_v@rediffmail.com